गोवा : धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली ‘पी.एफ्.आय.’चा समर्थक उमरान पठाण कह्यात !

उमरान पठाण हा पंचायत निवडणुकीचा उमेदवार

न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर उमेदवार उमरान पठाण हे मडगाव पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांसह
(स्रोत : THE GOAN NETWORK)

मडगाव, २ ऑगस्ट (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या जिहादी विचारसरणीच्या संघटनेचा समर्थक असलेला उमरान पठाण गोव्यात १० ऑगस्ट या दिवशी होणार्‍या पंचायत निवडणुकीत उभा राहिला आहे. उमरान पठाण  रुमडामळ पंचायतीच्या प्रभाग ८ मधून निवडणूक लढवत आहे. सामाजिक माध्यमांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अपकीर्त करणारे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात ‘पोस्ट’ केल्याच्या प्रकरणी मडगाव पोलिसांनी उमरान पठाण याला १ ऑगस्टच्या रात्री उशिरा कह्यात घेतले. रुमडामळ, दवर्ली हाऊसिंग बोर्डमधील मशिदीजवळ रहाणार्‍या नरेंद्र नाईक यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

तक्रारदारानुसार संशयित उमरान पठाण याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अपकीर्त करणारी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांत प्रसारित केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात ‘पोस्ट’ प्रसारित करून हिंदू आणि मुसलमान धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संशयित उमरान याने सामाजिक माध्यमांत ६ मासांपूर्वी हे विवादास्पद लिखाण केले होते. संशयित उमरान याच्या मते राजकीय कारणास्तव त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. (२ धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे लिखाण प्रसारित करून अल्पसंख्यांकांना खुश करून त्यांची मते मिळवणे, ही अल्पसंख्यांक नेत्यांची निवडणूक जिंकण्याची सोपी आणि प्रचलित अशी पद्धत आहे. राजकीय वरदहस्तामुळे पोलिसांचा धाक वाटत नसल्याने धर्मांध वारंवार धार्मिक तेढ निर्माण करणारे लिखाण करण्यास धजावतात !- संपादक) ‘पी.एफ्.आय.’चे पदाधिकारी इफ्तियाज शेख म्हणाले, ‘‘राज्य सरकार जाणूनबुजून काही जणांना लक्ष्य करत आहे.’’ (उमरान पठाण याने मुख्यमंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना लक्ष्य केले, त्याविषयी शेख का बोलत नाहीत ? नूपुर शर्मा यांचे समर्थन करणार्‍यांचा शिरच्छेद करणार्‍या ‘पी.एफ्.आय.’च्या जिहादी कार्यकर्त्यांविषयीही इफ्तियाज शेख गप्प का आहेत ? – संपादक)