समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

उदयपूर (राजस्थान) येथील कन्हैयालालच्या नृशंस हत्येच्या संदर्भात ‘भारतात वाढत असलेली तालिबानी मानसिकता ! ’ या विषयावर ‘ऑनलाईन विशेष संवाद’ !

श्री. विनोद बंसल

मुंबई – राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे. या हत्येमागे केवळ दोन मुसलमान नसून त्यामागे त्यांचा ‘ब्रेन वॉश’ (बुद्धीभेद) करणारे मदरसे, मौलवी आणि कट्टरवादी इस्लामी संघटना उत्तरदायी आहेत. हिंदूंच्या हत्या करणार्‍या अशा समाजविघातक प्रवृत्तींच्या केवळ घरावरच नव्हे, तर जिहादी विचारधारेवरही ‘बुलडोझर’ फिरवावा लागणार आहे. सरकार, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा या जिहाद्यांवर लगाम लावणार नसेल, तर हिंदु समाजाला दोषींवर कारवाई करण्यासाठी संघटित व्हावे लागेल, अशी चेतावणी विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विनोद बंसल यांनी दिली. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात वाढत असलेली तालिबानी मानसिकता !’, या विषयावरील ऑनलाईन विशेष संवादात ते बोलत होते.

आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे बंद करावेत ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या दुकानात ग्राहक बनून छुप्या पद्धतीने मुसलमानांनी त्यांची हत्या केली. कमलेश तिवारी यांचीही अशाच प्रकारे हत्या केली गेली. ही वीरता नसून नपुंसकता आहे. हिंदु समाज असा नाही. उलट राज्यघटनेच्या रूपात स्वतःची बाजू समोर मांडतो. जराही संयम न ठेवता सुरे घेऊन हत्या करणे, हा कुठला धर्म ? ‘आतंकवादाचा प्रारंभ मदरशांच्या मानसिकतेतून चालू होतो’, असे केरळचे राज्यपाल महंमद आरिफ यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे चीनने मदरशांमध्ये काय शिकवावे ? आणि काय नाही ? यांवर नियंत्रण ठेवले, त्याप्रमाणे भारत सरकारनेही केले पाहिजे. सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादी प्रशिक्षण देणारे मदरसे बंद केले पाहिजेत. ‘एन्.आय.ए.’ने (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने) केवळ हिंदूंच्या हत्येतील दोषींचा शोध न घेता ही हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी केली पाहिजे.

भारताला जिहाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्राने सैन्याला मोकळीक द्यावी ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल,राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी ‘पोस्ट’ (लिखाण) सोशल मिडियामधून (सामाजिक माध्यमांमधून) प्रसारित केल्यानंतर कन्हैयालाल यांना त्यांच्या जीवाला धोका असल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांनी उदयपूर पोलिस ठाण्यांत तक्रार केली; मात्र राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या राजस्थान पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर कन्हैयालाल यांची हत्या टळली असती. जिहादी मानसिकता बाळगणारे आतंकवादी केवळ हिंदूंचीच नव्हे, तर ख्रिस्ती, पारशी, यहुदी यांच्यासह जे ‘इस्लाम’ मानत नाहीत, त्या सर्वांचीच हत्या करतात. कट्टरतावादी मानसिकता संपवण्यासाठी आणि भारताला आतंकवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस अन् सैन्य यांना मोकळीक द्यायला हवी.

हलालच्या विरोधात रस्त्यावर येऊन लढा देणे आवश्यक ! – प्रशांत संबरगी, चित्रपट वितरक, उद्योगपती तथा हिंदु नेता, बेंगळुरू, कर्नाटक

श्री. प्रशांत संबरगी

हलाल जिहादची वस्तूस्थिती सामान्य नागरिकांना कळावी; म्हणून बेंगळुरू येथे १५० लोकांनी रस्त्यावर उतरून त्याला विरोध केला. सलग १५ दिवस सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्येक घर आणि दुकान येथे जाऊन त्याविषयी प्रबोधन केले. प्रत्येक दिवशी आम्ही १० सहस्र हस्तपत्रकांचे वितरण केले. याचा परिणाम असा झाला की, कर्नाटक सरकारने प्रत्येक आस्थापनांकडे ते ‘हलाल जिहाद’ची उत्पादने विकतात का ?’, याची विचारणा करून त्याची सूची मागितली. ही सर्व माहिती आमच्याकडे असून या विरोधात आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘लवकरच याचा निर्णय आमच्या बाजूने लागेल’, असा विश्वास आहे.