डिसलेगुरुजींच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
मुंबई – आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाच्या संदर्भात चुकीचे काम होऊ नये, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. ‘ग्लोबल टीचर ॲवार्ड’ विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसलेगुरुजींच्या चौकशीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी डिसले गुरुजींचे म्हणणे ऐकून घेतले आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या शिक्षकाच्या संदर्भात चुकीचे काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याविषयी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.
डिसलेगुरुजी यांच्यावर सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (तालुका माढा) येथील प्राथमिक शाळेतून डिसले यांचे स्थानांतर प्रतिनियुक्तीवर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात झाले असतांनाही नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत अनुपस्थित राहिले आणि परितेवाडी शाळेतही शालेय कामकाज केले नाही, यांसह अन्य आरोप चौकशी अहवालात करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात डिसलेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.