राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त !

राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल

मुंबई – राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्रे सिद्ध करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ११ सहस्र ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य करता यावे, यासाठी राज्यात पूरप्रवण भागांत राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये खेड येथील जगबुडी नदीने चेतावणीची पातळी गाठली आहे, तर गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी आणि इंद्रावती नद्यांनी धोक्यांची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची  सूचना देण्यात आली आहे. गडचिरोलीमधील १० सहस्र ६०६ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी न्यून झाली असून चंद्रपूर शहरातील पाणीही ओसरत आहे.