बरेली (उत्तरप्रदेश) येथे यावर्षी १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना !
जिल्ह्यात यावर्षी जानेवारी २०२२ ते १० जुलैपर्यंत लव्ह जिहादच्या ४६ घटना घडल्या आहेत. याविषयी बाल कल्याण समितीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील बहुतांश मुलींनी सांगितले की, त्यांना अंधारात ठेवण्यात आले आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.
चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या (हिंदु आघाडीवरच्या) साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादानेच अनेक अडथळ्यांवर मात करत आपण हिंदुत्वाचे कार्य करू शकतो’, असे ‘भारत हिंदु मुन्नानी’चे संस्थापक अध्यक्ष श्री. आर्.डी. प्रभु यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
नूपुर शर्मा यांचा शिरच्छेद करण्याची चिथावणी देणार्या गौहर चिश्तीला अटक !
पैगंबर यांचा अनादर टाळण्यासाठी आम्ही शिरच्छेद करण्यासही सिद्ध आहोत. नूपुर शर्मा यांनी चूक केली असून त्यांना जिवंत रहाण्याचा अधिकार नाही !’ अजमेर पोलिसांनी २५ जून या दिवशीच गौहर चिश्तीच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता.
‘डोलो ६५०’ गोळ्यांची विक्री वाढवण्यासाठी आधुनिक वैद्यांना सहस्रो कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा प्राप्तीकर विभागाचा दावा : विभागाचे ३६ ठिकाणी छापे
कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या ‘डोलो ६५०’ गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप केंद्रीय प्राप्तीकर विभागाने केला आहे.
इराण आणि तैवान या देशांनी भारताचा ४० सहस्र किलो चहा परत पाठवला !
यावरून इस्लामी देश आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची जाणूनबुजून अपकीर्ती करत असल्याचे उघड होते ! भारताने अशा उन्मत्त आणि खोटारड्या देशांना निर्यात करू नये !
भरतपूर (राजस्थान) येथील पुजार्याला मंदिर सोडून न गेल्यास शिरच्छेद करण्याची धमकी
एम्.एस्.जे. महाविद्यालयाच्या परिसरात असणार्या मंदिरातील पुजार्याला १० दिवसांत मंदिर सोडून न गेल्यास त्यांचा कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.
धर्मांध संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमाला १ सहस्र ५०० विद्यार्थिनी उपस्थित रहाणार !
हिजाब वादामध्ये पुढे असलेल्या आलिया असिदी ही मुसलमान विद्यार्थिनीही यामध्ये सहभागी होणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीवरून या कार्यक्रमात १ सहस्र ५०० विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
सात दिवसांच्या आत श्रीलंकेला नवा राष्ट्रपती मिळणार !
गंभीर आर्थिक आणि राजकीय संकट यांचा सामना करणार्या श्रीलंकेला येत्या ७ दिवसांच्या आत नवा राष्ट्रपती मिळेल. संसदेचे सभापती यापा अभयवर्धने यांनी १५ जुलै या दिवशी याची घोषणा केली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने केली हिंदूंच्या मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनीच बांगलादेशी हिंदूंच्या दु:स्थितीवर हसीना यांना विचारणा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !