मिर्झापूर (बांगलादेश) – बांगलादेशच्या टांगेल जिल्ह्यातील मिर्झापूर उपजिल्ह्यात असलेल्या भुसुंडी येथे बांगलादेशात सत्तेवर असलेल्या ‘युनियन अवामी लीग’ या पक्षाचा नेता अबुल खैर बक्षी याने २५-३० कट्टरतावादी मुसलमानांच्या साहाय्याने येथील हिंदूंच्या एका मंदिरावर आक्रमण केले. या वेळी त्यांनी मंदिरातील ३ मूर्तींची तोडफोड केली. तसेच मंदिर परिसरातील सर्व झाडे तोडून टाकली. ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ही माहिती देणारे ट्वीट करण्यात आले आहे. ‘पंतप्रधान शेख हसीना या त्यांच्या धर्मांध नेत्यांवर कारवाई करतील का ?’, असा प्रश्नही ट्वीटमधून उपस्थित करण्यात आला.
संपादकीय भूमिकाबांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनीच बांगलादेशी हिंदूंच्या दु:स्थितीवर हसीना यांना विचारणा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |