सात दिवसांच्या आत श्रीलंकेला नवा राष्ट्रपती मिळणार !

कोलंबो – गंभीर आर्थिक आणि राजकीय संकट यांचा सामना करणार्‍या श्रीलंकेला येत्या ७ दिवसांच्या आत नवा राष्ट्रपती मिळेल. संसदेचे सभापती यापा अभयवर्धने यांनी १५ जुलै या दिवशी याची घोषणा केली. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पदाचे त्यागपत्र दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

१. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांना सहभागी होता यावे, यासाठी जनतेने शांतता राखावी, असे आवाहन अभयवर्धने यांनी केले.

२. श्रीलंकेतून पलायन केलेले राजपक्षे हे प्रथम मालदीवला आणि नंतर सिंगापूरला गेले. ते सिंगापूरहून सौदी अरेबियाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

३. श्रीलंकन सैन्याने राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यासह सर्वच प्रशासकीय इमारतींवरून जनतेला दूर हटवले आहे. नागरिकांनी संसदेत प्रवेश करू नये, यासाठी रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. देशातील हिंसक आंदोलन रोखण्यासाठी सैन्याला बळाचा वापर करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

४. श्रीलंकन जनता करत असलेल्या निदर्शनांत १ जण ठार, तर ७५ जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे.