धर्मांध संघटना ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यक्रमाला १ सहस्र ५०० विद्यार्थिनी उपस्थित रहाणार !

मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील हिजाबच्या (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेल्या वस्त्राच्या) वादावरून उसळलेल्या हिंसाचाराची सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेने १६ जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. (कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर अद्याप बंदी न घातल्यामुळेच तिची विद्यार्थी शाखा दिवसाढवळ्या कार्यक्रम आयोजित करण्याचे दुःसाहस करते, हे लज्जास्पद ! – संपादक) हिजाब वादामध्ये पुढे असलेल्या आलिया असिदी ही मुसलमान विद्यार्थिनीही यामध्ये सहभागी होणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीवरून या कार्यक्रमात १ सहस्र ५०० विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.