ठाणे शहराला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी !

मुंबई महानगरपालिकेची मान्यता !

मुंबई महानगरपालिका

ठाणे, १० मे (वार्ता.) – मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे शहराला १० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा संमत झाला आहे. या पाण्याचा पुरवठा वागळे इस्टेट परिसराला होणार आहे. यामुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या सुटण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेलाही या संदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेनेही मुंबई महानगरपालिकेकडे पाण्याची मागणी केली होती. त्यास मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे ठाणे शहराला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.