मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात ३० एप्रिल या दिवशी दुपारी १२ वाजता सुनावणी होणार आहे. यापूर्वी त्यांच्या जामिनावर २९ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार होती. राणा दांपत्य प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयात केली होती; मात्र कामकाजाच्या व्यस्ततेमुळे ही सुनावणी ३० एप्रिल या दिवशी घेण्यात येईल, हे न्यायालयाने स्पष्ट केले. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.