भीम आर्मीची धमकी !
मुंबई – मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशीच्या संभाजीनगर येथील सभेत पोलिसांनी दिलेल्या अटींचे उल्लंघन केले, तर आम्ही सभा बंद पाडू, अशी धमकी भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिली आहे. पोलिसांनी १६ अटी घालत राज ठाकरे यांच्या सभेला अनुमती दिली आहे. ‘यामध्ये जातीय तेढ आणि धार्मिक भावना भडकवणारे वक्तव्य करू नये’, अशी अट आहे.
‘सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी आणि असभ्य वर्तन करू नये. सभाकाळात कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये’, अशा अटी पोलिसांनी घातल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला जाणार आहेत.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘पोलिसांनी घातलेल्या अटींचे पालन केले जाईल. पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. आम्ही आमचे काम करू. आम्हाला कोणतीही अट जाचक वाटत नाही.’’
संपादकीय भूमिका
|