तलाकची बातमी दिल्याने पत्रकाराला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक !

यावरून धर्मांधांना कायद्याचा जराही धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होते !

रायगड – तलाकची बातमी लावल्याचा राग मनात धरून पत्रकाराला मारहाण केल्याची घटना म्हसळा शहरात (जिल्हा रायगड) १० मार्च या दिवशी घडली. याविषयी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी साजिद इनामदार याला अटक करण्यात आली आहे. पत्रकार निकेश कोकचा यांनी वर्ष २०१९ मध्ये साजिद इनामदार याच्या तलाकच्या संदर्भात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध केली होती.

१० मार्च या दिवशी सायंकाळी निकेश हे बाजारपेठेत गेले होते. तेथे साजिदने त्यांना अडवून तलाकची बातमी दिल्याने अपकीर्ती झाल्याचे सांगत त्यांना मारहाण केली.