आरोग्य विभागाच्या धनादेशामुळे शाहू स्टेडियममधील वीजपुरवठा होणार पूर्ववत् !

यापूर्वीही ‘जम्बो कोविड सेंटर’चे ३० लाख रुपये वीजदेयक थकवण्यात आले होते. सामाजिक प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर २८ लाख रुपये वीजदेयक भरण्यात आले होते.

(म्हणे) ‘आरक्षणावर मार्ग निघत नसेल, तर आंदोलन उभे राहील !’ – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री

पुढच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळेल. सर्व अधिकारी, सचिव यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हे सूत्र हातात घेणे आवश्यक आहे.

सी.बी.आय. विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद प्रकरण

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठराव झाला असला, तरी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होतील, अशी भूमिका राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरविंदर पाल सिंह मदान यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे स्पष्ट केली.

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील होण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांचा दृढनिश्चय !

हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्तरांवर प्रबोधन केले.

इतर मागासवर्गीय समाजाच्या ४१३ जागांवर खुल्या प्रवर्गातून होणार निवडणूक !

२७ टक्क्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजासाठी ४१३ जागा आरक्षित होत्या; मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या जागा खुल्या प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ‘मिळकतकर अभय योजना’ राबवणार !

मतांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात. थकबाकीदारांमध्ये निवडणुका आल्या की, ‘करसवलत मिळते’, अशी चुकीची धारणा व्हायला नको !

‘ब्लूटूथ’च्या माध्यमातून केली कॉपी ! : एस्.आर्.पी.एफ्. परीक्षेमध्ये अपप्रकार उघडकीस !

शालेय शिक्षणामध्ये मूल्यशिक्षण आणि धर्मशिक्षण यांचा अंतर्भाव केल्यास शालेय जीवनातच मुलांवर संस्कार होतील.

‘ऑनलाईन’ परीक्षांचा पर्याय कायमस्वरूपी नसणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोना महामारीमुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत; मात्र आपण हळूहळू ‘ऑफलाईन’ परीक्षांकडे आले पाहिजे. हीच राज्य सरकारची भूमिका आहे.

सातारा स्थायी समिती सभेत केवळ २० मिनिटांत ३९७ विषयांना अनुमती 

केवळ २० मिनिटांमध्ये ३९७ विषयांना अनुमती देणे म्हणजे सभा ही केवळ नावासाठीच घेत आहेत का ? अशा प्रकारे सभा घेणारे लोकप्रतिनिधी अन्य वेळी कसा कारभार करत असतील ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?