‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेच्या विरोधातील लढ्यात कृतीशील होण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्र आणि धर्मप्रेमी यांचा दृढनिश्चय !

कोल्हापूर येथे धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना १. श्री. मनोज खाडये

कोल्हापूर – भारतीय अर्थव्यवस्था आणि व्यापार यांत हस्तक्षेप करून देशात समांतर अशी धर्मांध अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे जागतिक षड्यंत्र ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू आहे. हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी समितीच्या ‘संपर्क अभियाना’च्या अंतर्गत ‘हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेचे भारतीय अर्थव्यवस्थेला असलेले धोके आणि हिंदूंची भूमिका’ यांविषयी कोल्हापूर जिल्ह्यात विविध स्तरांवर प्रबोधन केले. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद व्हावी, यांसाठी आम्हीही कार्यरत राहू, असा निर्धार व्यक्त केला. कोल्हापूर शहर, हुपरी, मलकापूर, बांबवडे, तसेच सरवडे येथे धर्मप्रेमी, व्यापारी, विविध संघटना यांच्यासाठी चर्चासत्र झाले.

हुपरी येथे चांदी व्यापार्‍यांसाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचा निश्चय !

हुपरी येथे धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

हुपरी – श्री. धनंजय धायगुडे यांच्या निवासस्थानी ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी श्री. मनोज खाडये यांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात व्यापारी, उद्योजक आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. विषय ऐकल्यावर सर्वांनीच ‘हा विषय गंभीर असून आम्ही आमच्या स्तरावर याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे सांगितले, तसेच तेथील चांदी व्यापार्‍यांसाठी या विषयावर बैठक आयोजित करण्याचे ठरवले.

मलकापूर येथे व्यापार्‍यांसाठीच्या चर्चासत्रात प्रशासनास निवेदन देण्याचा निर्णय !

मलकापूर येथे धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

मलकापूर – येथे ‘हलाल अर्थव्यवस्थे’विषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला गावातील एकूण २५ हिंदु व्यापारी उपस्थित होते, तसेच विविध पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यापार्‍यांनी अत्यंत गांभीर्याने विषय समजून घेतला आणि व्यापारी संघटनेच्या वतीने प्रशासनाला या अर्थव्यवस्थेवर बंदी घालण्यात यावी यासाठी निवेदन देण्याचे ठरले.

सरवडे येथील चर्चासत्रानंतर गावागावांत जागृती करण्याचा निर्धार !

तुरंबे येथे धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. मनोज खाडये

सरवडे – येथे ‘हलाल प्रमाणपत्रा’ विषयी तुरंबे येथील श्री. प्रदीप सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला तुरंबे, सरवडे तसेच आजूबाजूच्या गावांतील ९ धर्मप्रेमी उपस्थित होते.  बैठकीला उपस्थित असलेल्या बहुतांश जणांनी समितीच्या प्रत्येक चळवळीत सहभागी होण्याची सिद्धता दाखवली आणि सर्वांनी हलाल अर्थव्यवस्था या षड्यंत्राविषयी आपापल्या गावांत जागृती करण्याचा दृढनिश्चय केला.

विशेष – ही बैठक यशस्वी होण्यासाठी धर्मप्रेमी श्री. प्रदीप यांनी त्यांचा केशकर्तनाचा व्यवसाय सांभाळून तळमळीने प्रयत्न केले.

बांबवडे येथे हिंदु व्यापार्‍यांच्या बैठकीत प्रशासनास निवेदन देण्याचा निर्णय !

बांबवडे येथे धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना १. श्री. मनोज खाडये

बांबवडे – येथील चर्चासत्राला गावातील ७ हिंदु व्यापारी उपस्थित होते. व्यापारी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्याचे ठरले.