इतर मागासवर्गीय समाजाच्या ४१३ जागांवर खुल्या प्रवर्गातून होणार निवडणूक !

मुंबई, १५ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील पंचायत सिमती, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २ सहस्र १२१ जागांसाठी २१ डिसेंबर या दिवशी निवडणूक होणार आहे. यांमध्ये २७ टक्क्यांप्रमाणे इतर मागासवर्गीय समाजासाठी ४१३ जागा आरक्षित होत्या; मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या जागा खुल्या प्रवर्गातून लढवल्या जाणार आहेत.