कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

सर्वच वाचकांना स्वतःच्या पाल्यांवर संस्कार कसे करावेत ? हे कळण्यासाठी उपयुक्त असलेली लेखमालिका !

आज १९.९.२०२१ या दिवशी  अनंतचतुर्दशी आहे. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) या दिवशी भंडारा करत. इंदूर (मध्यप्रदेश) येथील भक्तवात्सल्याश्रमात प.पू. श्री अनंतानंद साईश (प.पू. बाबांचे गुरु) प्रणीत होत असलेला हा भंडारा म्हणजे प.पू. बाबांचे शिष्य आणि भक्त यांच्यासाठी आनंदाची पर्वणीच असायची. अशीच एक आनंदाची पर्वणी माझ्या जीवनात आली होती, ती म्हणजे प.पू. बाबांनी वर्ष १९८७ मध्ये माझे वडील ती. दादा ‘संत’ असल्याचे सांगितले. असे संतपदी विराजमान झालेले पू. दादा (पू. बाळाजी वासुदेव आठवले) यांची सर्वांना ओळख व्हावी; म्हणून ही लेखमालिका आजपासून दर रविवारी आरंभ करत आहोत.

संकलक : (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले

मनोगत

‘ती. दादांच्या (माझ्या वडिलांच्या) लिखाणाच्या आधारे मी संकलित केलेली आणि वर्ष २०१४ मध्ये प्रकाशित केलेली ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ ही ५ ग्रंथांची (४ मराठी आणि १ इंग्रजी भाषेतील) ग्रंथमालिका पुन्हा वाचत असतांना मला त्यांची अनेक वैशिष्ट्ये लक्षात आली.

माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज माझ्या वडिलांच्या संदर्भात म्हणायचे, ‘ते तर संतच आहेत !’ ते त्यांना नेहमी पलंगावर त्यांच्या शेजारी बसवायचे. माझ्या वडिलांमुळे माझी आईही (आम्ही आईला ‘ताई’ म्हणायचो.) संतपदाला पोचली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

१. संत ती. दादा आणि संत सौ. ताई यांच्यामुळे त्यांच्या पाचही मुलांची  साधनेत झालेली कल्पनातीत प्रगती !

ती. दादा आणि सौ. ताई यांच्यामुळे आमच्या घरचे वातावरण आध्यात्मिक होते. त्यांचे नेहमीचे सहज बोलणे आणि वागणे यांमुळेही आमच्यावर साधनेचे संस्कार झाले. त्याच्या संस्कारांमुळे माझ्या भावांचीही साधनेत अप्रतिम प्रगती झाली आहे.

१ अ. माझ्या चार भावांपैकी २ भावांनी संत होणे आणि दोघांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे

साधक ६० ते ६९ टक्के आध्यात्मिक पातळीला जीवन-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. ७० ते ७९ टक्के पातळीला संतपदाला पोचतो, तर ८० ते ८९ टक्के पातळीला सद्गुरुपदाला पोचतो.

१. माझे सर्वांत मोठे बंधू ती. कै. डॉ. वसंत : हे वर्ष २०१२ मध्ये संतपदाला पोचले आणि वर्ष २०१७ मध्ये सद्गुरुपदाला पोचले.

२. माझे दोन क्रमांकाचे मोठे बंधू ती. अनंत : हे वर्ष २०१९ मध्ये संतपदाला पोचले.

३. माझे धाकटे बंधू कै. डॉ. सुहास : यांनी वर्ष २०२१ मध्ये ६४ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली.

४. माझे सर्वांत धाकटे बंधू विलास : यांचीही आध्यात्मिक प्रगती आहे.

आपण अनेक संतांची चरित्रे वाचतो. एकाही संतांच्या चरित्रात त्यांच्या सर्व मुलांनी साधनेत चांगली प्रगती केली, असे वाचनात येत नाही. यावरून माझ्या आई-वडिलांचे अद्वितीय वैशिष्ट्य लक्षात येते.

२. ती. दादा यांच्या सहवासातील  साधकांनाही झालेला लाभ !

शीव, मुंबई येथे माझ्या घरी पू. दादा आणि पू. ताई रहात असतांना काही काळ तेथे रहाणार्‍या साधकांनीही त्यांची सेवा केली. या साधकांनाही त्यांच्या सत्संगाचा लाभ होऊन त्यांचीही आध्यात्मिक उन्नती झाली आहे, उदा. श्री. सत्यवान कदम आणि कु. अनुराधा वाडेकर हे दोघे सद्गुरुपदाला पोचले आहेत, तर सौ. भक्ती खंडेपारकर आणि श्री. दिनेश शिंदे यांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

३. सनातन संस्थेमध्ये साधना  करणार्‍या काही कुटुंबियांची उदाहरणे !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारे अनेक परिवार असे आहेत की, ज्यांमध्ये पालक आणि आता त्यांची मुलेही चांगली आध्यात्मिक उन्नती करत आहेत, उदा.

अ. पू. अशोक पात्रीकर यांचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्यांच्या दोन्ही मुली ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या असून त्यांची पत्नी, मुलगा आणि सून हेही पूर्णवेळ साधनारत आहेत.

आ. पू. (श्रीमती) राधा प्रभु यांचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्यांचा मुलगा, तसेच दोन्ही सुना ६० टक्क्यांहून अधिक पातळीच्या असून त्यांचा पणतू पू. भार्गवराम ते सनातनचे पहिले बालक संत आहेत. त्यांचा नातू आणि नातसूनही साधनारत आहेत.

इ. पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्यांचा मोठा मुलगा, मोठी सून, तसेच मुलगी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीची असून त्यांचा लहान मुलगा आणि लहान सून हेही पूर्णवेळ साधनारत आहेत.

ई. पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्यांचा मोठा मुलगा, धाकटी सून, तसेच दोन नाती ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या आहेत.

उ. पू. रमानंद गौडा यांचे पूर्ण कुटुंब साधनेत आहे. त्यांचे काका, काकू, दोन चुलत भाऊ, दोन्ही चुलत भावांच्या पत्नी, तसेच सासू, सासरे, पत्नी आणि मेव्हणी हे सर्व जण ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे आहेत. त्यांची दोन्ही मुले उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आहेत.

सनातनमध्ये असे अनेक परिवार आहेत की, जे पूर्णवेळ साधना करत असून त्यांनी चांगली आध्यात्मिक उन्नती केली आहे.

हा लेख वाचून काही वाचकांना साधना करण्याची आणि कुटुंबियांकडून साधना करून घेण्याची दिशा मिळाली, तर हा लेख सार्थकी लागेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(१४.९.२०२१)

(क्रमशः)

१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी पृष्ठ ९ वर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याबद्दल त्यांचे धाकटे बंधू डॉ. विलास यांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला. त्यांचे उर्वरित लेख ‘कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय पू. बाळाजी (दादा) आठवले !’या  लेखमालिकेनंतर प्रसिद्ध करत आहोत. – संपादक

पू. दादांनी केलेल्या लिखाणाचे अद्वितीयत्व !

माझ्या वडिलांनी केलेले लिखाण, लिहिलेली पत्रे, केलेल्या कविता इत्यादी इतके अप्रतिम आहे की, त्यांचे संकलन करून मी पुढील ५ ग्रंथ (४ मराठी आणि १ इंग्रजी भाषेतील) वर्ष २०१४ मध्ये प्रकाशित केले.

ग्रंथ १ : सुगम सात्त्विक जीवन (मुलांवर सात्त्विकतेचे संस्कार करणार्‍या पित्याचे मार्गदर्शन !)

ग्रंथ २ : सुगम भक्तीयोग (नामसंकीर्तनयोगाच्या सोप्या विवेचनासह !)

ग्रंथ ३ : सुगम अध्यात्म (दैनंदिन जीवनात अध्यात्म कृतीत आणण्यासाठीचे मार्गदर्शन !)

ग्रंथ ४ : नावांवरून होणार्‍या कविता (व्यवहार आणि अध्यात्म यांची शिकवण देणार्‍या कविता)

ग्रंथ ५ : Poetry created around Names (Poetry that teaches how to spiritualise worldly life) (इंग्रजी ग्रंथ)

वाचकांना या ग्रंथांचे होऊ शकणारे लाभ !

बर्‍याच साधकांना वाटते, ‘आपली मुले चांगली व्हावीत. त्यांनीही साधना करावी’; पण त्यांना ‘आपण मुलांशी कसे बोललो, कसे वागलो की, ती चांगली होतील, त्यांच्यावर साधनेचे संस्कार होतील’, हे ज्ञात नसते. माझ्या वडिलांनी आम्हा ५ भावंडांवर कसे संस्कार केले, त्यांनी आम्हाला काय शिकवले इत्यादी त्यांनी लिहिलेल्या वरील ५ ग्रंथांवरून लक्षात येईल. त्यांचा साधकांनी अभ्यास करून त्याप्रमाणे कृती केली, तर त्यांची मुलेही साधनेत निश्चितच प्रगती करतील !

वर्ष २०१४ मध्ये प्रकाशित झालेले हे ग्रंथ बहुतेक नवीन साधकांना ज्ञात नाहीत आणि जुन्या साधकांना त्यांचे महत्त्व कळलेले नाही. सर्व साधकांना या ग्रंथांचा लाभ व्हावा, यासाठी हे लिखाण आणि ग्रंथांतील काही मजकूर ‘सनातन प्रभात’मध्ये पुन्हा प्रकाशित करत आहोत. ‘साधकांनी या ग्रंथांचा अवश्य लाभ घ्यावा’, अशी माझी त्यांना विनंती !

ग्रंथ ४ आणि ५ : ‘नावांवरून होणार्‍या कविता’ या ग्रंथांत मराठीत आणि हिंदीत ‘अ ते ज्ञ’ आणि इंग्रजीतील ‘A to Z’ या अक्षरांवरून होणार्‍या नावांच्या आध्यात्मिक स्तरावरच्या कविताही दिल्या आहेत. त्यांचा वापर करून वाचक आपल्या मुला-मुलींना ‘त्यांच्या नावाची कविता केली’; म्हणून कविता देऊ शकतात !