(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्य होऊ शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह

देशातील अनेक जिल्हे आणि तालुके आता मुसलमानबहुल झाले आहेत. तेथील हिंदूंवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जातो, त्यांना तेथून पलायन करण्यास बाध्य केले जाते, याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ?

प्रांताधिकारी यांच्या पुढाकारामुळे दहिवडी (जिल्हा सातारा) येथील शासकीय जागेचा होणार कायापालट !

माण (जिल्हा सातारा) येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर विविध शासकीय विभागांची ६ हेक्टर जागा आहे. अनेक वर्षांपासून ही जागा विनावापर पडून होती.

मराठवाड्यातील पावसाने नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांना झोडपले !

अतीमुसळधार पावसाने नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

अमरावती येथे ‘अंडरपास’मध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपक्ष आमदार रवि राणा यांनी शहर अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून बळजोरीने चालायला लावले !

रस्त्याची अशी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या लाखो रुपयांची हानी करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपति पंचायतन संस्थानचा उत्सव साध्या पद्धतीने होणार ! – जयदीप अभ्यंकर

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपति पंचायतन संस्थानचा उत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते दरबार हॉल येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर मराठवाड्यातील समितीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘ऑनलाईन संपर्क कौशल्यवृद्धी कार्यशाळा’ पार पडली !

या कार्यशाळेला सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

‘अँटिलिया’ प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच दिली ! – सायबर तज्ञाचा आरोप

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेपुढे आले पाहिजे ! सातत्याने होणारे लाचखोरीचे आरोप हे पोलीस खात्यासाठी लज्जास्पद !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सांस्कृतिक आघाडी जिल्हाप्रमुख ओंकार शुक्ल यांना ९ ते २० सप्टेंबर या कालावधीत सांगली महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदीची नोटीस !

या संदर्भात श्री. ओंकार शुक्ल म्हणाले, ‘‘मला आलेली नोटीस पूर्णत: चुकीची असून ही कारवाई पोलीस प्रशासनाकडून सूडबुद्धीने करण्यात आली आहे. या कारवाईचा मी निषेध करतो.

‘मोदी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीने मुंबईहून गणेशभक्त कोकणात दाखल !

या गाडीतील प्रवाशांना विनामूल्य प्रवासासह एकवेळचे जेवण आणि पाणीही विनामूल्य देण्यात आले होते.

शासनाला स्वातंत्र्यसैनिकांचा आदर नाही ! – गिरीश चोडणकर, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा सापडला कंत्राटदाराच्या गोदामात !