
सांगली, ८ सप्टेंबर – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपति पंचायतन संस्थानचा उत्सव साध्या पद्धतीने होणार आहे. १० सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या हस्ते दरबार हॉल येथे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या प्रसंगी कोणतीही मिरवणूक, वाजंत्री, तसेच अन्य कोणताही लवाजमा असणार नाही.
‘१४ सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन राज परिवाराच्या उपस्थितीत साधेपणाने होणार आहे’, अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली. ‘भाविकांनीही दरबार हॉल, गणपति मंदिर आणि सरकारी घाट येथे विसर्जनप्रसंगी गर्दी करू नये’, असे त्यांनी म्हटले आहे.
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता