सात्त्विक आहार बनवण्यासाठी काय कराल ?

‘स्वयंपाकघरात किंवा जवळच लावलेला रेडिओ, टेप, तसेच दूरदर्शन संच (टी.व्ही.) यांतून घर्षणात्मक अतीवेगवान स्पंदने तेजाच्या स्तरावर आल्याने अन्न घटकातील पोषकद्रव्यांचा र्‍हास होतो. यामुळे मनुष्यजिवाला निःसत्त्व अन्न मिळते.

नैवेद्याचे सात्त्विक अन्न !

नैवेद्याच्या ताटातील (पानातील) पदार्थांमध्ये तिखट आणि मीठ यांचा वापर अल्प करतात. तसेच तेलाच्या ठिकाणी तुपाचा वापर करून पदार्थ अधिक सात्त्विक बनवतात.

तमोगुणी ‘फास्ट फूड’ !

‘फास्ट फूड’ बाह्यतः चवीला चटपटीत लागत असले, तरी तो तमोगुणी आहार असल्याने त्याचे शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दुष्परिणाम होतात.

समतोल आहार हाच सात्त्विक आहार !

दोन पोळ्या, भाताची मूद, डाळीचे वरण, भाजी, चटणी, कोशिंबीर, टोमॅटो, एक वाटी दही, एखादे केळे किंवा संत्रे. या अन्नातून तुम्हाला २२०० उष्मांक (कॅलरीज्) मिळतात. तुम्ही पूर्णपणे निरोगी आणि उत्साही राहू शकता.

वाळवलेले आणि दळलेले धान्य सात्त्विक का असते ?

‘पाखडण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्म स्तरावर धान्याचे पूर्ण शुद्धीकरण होत नसल्याने पूर्वी असे धान्य धुऊन ते वाळवून जात्यात दळण्याची पद्धत होती.

बाहेरचे पदार्थ खाण्याची वेळ आल्यास काय करावे ?

बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने वाईट शक्ती खाण्यातून आक्रमण करू शकतात. हे आक्रमण वा त्रास होऊ नये; म्हणून बाहेर खातांना ते पदार्थ ईश्‍वराला अर्पण करून आणि प्रार्थना अन् नामजप करत खावेत.

पारंपरिक पौष्टिक आहारच सात्त्विक !

आहार सेवन आणि पचन यांमध्ये चार घटक कार्य करतात. ते म्हणजे मन, रसना (जीभ), अग्नी आणि जठर (आमाशय). या सर्व घटकांचा विचार करून समतोल आणि आवश्यक आहार सेवन करावयास हवा; मात्र सध्या आहाराच्या पौष्टिकतेपेक्षा चविष्टतेकडेच लोकांचा जास्त कल दिसून येतो.

जेवणात भात नसल्यास चुकल्यासारखे का वाटते ?

इतर धान्यांच्या तुलनेत तांदळात सर्वाधिक सात्त्विकता आहे. तसेच तांदूळ हे लवकर पोट भरण्याचे साधन असल्याने जेवणात भात किंवा तांदळाची भाकरी नसल्यास बहिर्मुखता असलेल्या जिवांनाही अन्नग्रहणातील उणीव जाणवते.

आदर्श भोजन कसे असावे ?

उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे वीर्याविरुद्धम् इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं नातिद्रुतं नातिविलम्बितम् अजल्पन् अहसन् तन्मना भुञ्जीत आत्मानम् अभिसमीक्ष्य सम्यक् । – चरकसंहिता, विमानस्थान, अध्याय १, सूत्र २४

‘हिंदु राष्ट्र’ : दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १९ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !