बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने वाईट शक्ती खाण्यातून आक्रमण करू शकतात. हे आक्रमण वा त्रास होऊ नये; म्हणून बाहेर खातांना ते पदार्थ ईश्वराला अर्पण करून आणि प्रार्थना अन् नामजप करत खावेत.
बाहेरचे खाण्याने त्रास झाल्यास स्नान करावेे !
आपण बाहेर कुठेही खाल्ले, तर त्याचा दोष आपल्याला लागतोच. अन्न बनवणारे आणि वाढणारे (वेटर) यांचे आचार-विचार, उपाहारगृह चालकाची जास्त लाभ मिळवण्याची वृत्ती (उदा. कनिष्ठ प्रतीचे अन्न देणे) या सर्वांचे दोष आपल्या शरिरात जातात. काही वेळा बाहेरचे खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी ‘अन्नदोषांचे प्रमाण फारच आहे’, असे समजावे. अशा वेळी त्वरित स्नान करावे.
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |