‘पाखडण्याच्या प्रक्रियेतून सूक्ष्म स्तरावर धान्याचे पूर्ण शुद्धीकरण होत नसल्याने पूर्वी असे धान्य धुऊन ते वाळवून जात्यात दळण्याची पद्धत होती. पाण्याने धान्य धुऊन ते वाळवून मग जात्यात दळल्याने धान्य धुतांना पाण्यात रज-तमात्मक लहरी सामावून जाऊन धान्य वाळवल्याने त्यातील उरली सुरली त्रासदायक स्पंदने उन्हातील तेजाने नष्ट होतात आणि असे शुद्ध धान्य जात्यात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणार्या हाताच्या हालचालीतून आणखी शुद्ध अन् चांगल्या स्पंदनांनी भारित करून त्यातून पीठ काढले जाते. यापासून बनलेले अन्न अत्यंत सात्त्विक असते. जात्यावर वाकून दळण दळतांना जिवाचे नाभीस्थित पंचप्राण कार्यरत होऊन त्याची सूर्यनाडी जागृत होतेे. या नाडीमुळे होणार्या हाताच्या हालचालीतून या क्रियेला वायूमंडलातील रज-तमात्मक स्पंदनांच्या आक्रमणांपासून पूर्ण रक्षण दिले जाते.’
– एक विद्वान [श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००८, दुपारी ३.१३]
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |