आदर्श भोजन कसे असावे ?

उष्णं स्निग्धं मात्रावत् जीर्णे वीर्याविरुद्धम् इष्टे देशे इष्टसर्वोपकरणं नातिद्रुतं नातिविलम्बितम् अजल्पन् अहसन् तन्मना भुञ्जीत आत्मानम् अभिसमीक्ष्य सम्यक् । – चरकसंहिता, विमानस्थान, अध्याय १, सूत्र २४

अर्थ : जेवण नेहमी उष्ण, स्निग्ध आणि योग्य प्रमाणात असावे. जेवणात चुकीचे संयोग (उदा. दूध आणि फळे एकत्र) असू नयेत. जेवणासाठी चांगल्या ठिकाणी बसावे. त्यासाठी लागणारी भांडी (उदा. ताट इत्यादी) स्वच्छ असावीत. जेवतांना स्वतःच्या प्रकृतीचा नीट विचार करून एकाग्र चित्ताने जेवावे. घाईघाईत किंवा रेंगाळत जेवू नये. जेवतांना बडबड करणे आणि हसणे टाळावे.