नैवेद्याचे सात्त्विक अन्न !

नैवेद्याच्या ताटातील (पानातील) पदार्थांमध्ये तिखट आणि मीठ यांचा वापर अल्प करतात. तसेच तेलाच्या ठिकाणी तुपाचा वापर करून पदार्थ अधिक सात्त्विक बनवतात. तिखट, मीठ, तेल यांसारखे रज-तमयुक्त घटक टाळून केलेल्या किंवा त्यांचा वापर अल्प प्रमाणात केलेल्या अन्नपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. हे अन्न देवाला दाखवल्यामुळे त्या देवतेचे तत्त्व त्यात येते आणि त्या अन्नाची सात्त्विकता अधिकच वाढते. हे अन्न, उदा. त्यातील भात स्वयंपाकघरातील सर्व भातात मिसळला की, जेवणात भात घेणार्‍या सर्वांनाच सात्त्विकता मिळते. अशी कृती नैवेद्याच्या ताटातील अन्य पदार्थांविषयीही करावी.