आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले ! – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० मे या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘सरकारने तातडीने एका मासात आयोग स्थापन करावा, तसेच ३ मासांत माहिती सिद्ध करून ती न्यायालयात प्रविष्ट करावी’, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.