सातारा, ३० मे (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या वतीने गरीब आणि गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेतच ही थाळी देण्यात येत होती; मात्र आता सायंकाळीही शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.