‘साधकांना सर्व संकटांचा खंबीरपणे सामना करता यावा’, यासाठी साधनेची शिकवण देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातनचे सहस्रो साधक सध्याच्या सामाजिक प्रतिकूलतेचा सामना खंबीरपणे करत आहेत, तसेच स्वतः स्थिर राहून इतरांनाही आधार देत आहेत. याचे खरे गमक परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या साधनेच्या संस्कारांमध्ये आहे.

साधकांचे आपत्काळात रक्षण होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असलेले कृपावत्सल परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात केलेले हे कार्य हा केवळ इतिहास नसून साधकांना कलीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी दिलेला लढा आहे. त्यांतील काही प्रमुख सूत्रेच शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले !

१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार लवकरच आपत्काळ येईल. सेवा आणि साधना करण्यासाठी प्रतिकूल वातावरण निर्माण होईल.

आपत्काळाच्या भीषणतेविषयी वेळोवेळी सूचित करणारे आणि त्यासंदर्भात उपाययोजना काढणारे द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपत्काळाची चाहूल ओळखून केवळ साधकांना सूचित केले नाही, तर साधकांना पुढील काळात सुविधाजनक व्हावे, यासाठी प्रत्यक्ष उपाययोजनाही आरंभल्या. त्यांनी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर साधकांची प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची सिद्धता करवून घेतली आहे !

घोर आपत्काळात साधकांना जगण्यासाठी चैतन्याचा श्‍वास देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

​‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या चैतन्याच्या श्‍वासामुळे या घोर आपत्काळातही तीव्र त्रास सहन करत साधक १० ते १५ घंटे साधना करू शकत आहेत, नाहीतर वातावरणातील नकारात्मक शक्तींनी साधकांना कधीच मारून टाकले असते.’