गुरुदेव, अनंत अनंत कृतज्ञता !

​हे जगत्पालक महाविष्णुस्वरूप गुरुदेव, सारे विश्‍व विविध संकटांत होरपळत आहे. सर्वत्र अनाचार आणि अधर्म यांचा अंधःकार पसरला आहे. अखिल मानवजात चिंता आणि असुरक्षितता यांनी ग्रासलेली आहे. नैसर्गिक आपत्ती, महामारी, सामाजिक असुरक्षितता यांतच कौटुंबिक कलह, आर्थिक संकटे आदी दूरदूरपर्यंत सर्वत्र अडचणींचे डोंगरच दिसत आहेत !

हे गुरुदेव, या घनघोर आपत्काळात जे जे घडेल, ते स्वीकारण्यासाठी आम्हाला बळ द्या !  संकटे कितीही मोठी असली, तरी आपली कृपाछाया त्यांच्यापेक्षा कैक पटींनी मोठी आहे ! हे गुरुदेव, गेली अनेक वर्षे आपण आमच्या मनावर केलेल्या साधनेच्या संस्कारांचा आविष्कार आपणच घडवा ! गुरुदेवा, आमच्यातील श्रद्धा आणि भक्ती बळकट करा ! साधकांसाठी काळाशीही दोन हात करणारी साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊली असतांना आम्हाला काळाचे भय ते काय ? हे भगवंता, आपण आमच्या आयुष्यात आला आहात, याहून दुसरे भाग्य नाही ! आपल्या कोमल चरणी अनंत अनंत कृतज्ञता भगवंता !