सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचे आवाहन
सोलापूर – महापालिकेच्या आरोग्य केंद्रांकडे कोरोनाची लस उपलब्ध नाही. लस आल्यानंतर प्रसार माध्यमांतून कळवले जाईल. त्यामुळे आता आरोग्य केंद्रांवर गर्दी करू नका, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
याविषयी पी. शिवशंकर म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाची मोहीम गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पद्धतीने पालिकेने सर्व केंद्रांवर नियोजन केले आहेे; मात्र सध्या कोरोनाची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना कळवण्यात येईल. नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करूनच आरोग्य केंद्रात यावे.