येळंबघाट (जिल्हा बीड) येथे कोरोना प्रतिबंधक लस मिळवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी, पोलिसांकडून सौम्य लाठीमार

प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार

बीड – जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले. पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.

८ एप्रिल या दिवशी आरोग्य विभागाकडे केवळ २ सहस्र ६०० लसींचे डोस उपलब्ध होते. यातील येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर लसीचे २०० डोस शिल्लक होते आणि ५०० पेक्षा अधिक नागरिकांनी केंद्रावर गर्दी केली. यात नागरिक लसीकरणासाठी थेट लसीकरण केंद्रात घुसल्याने आरोग्य कर्मचार्‍यांना पोलिसांना पाचारण करावे लागले.