लक्ष्मणपुरी (अयोध्या) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीरामजन्मभूमी हिंदूंना देण्यात येतांना मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार अयोध्येतील धन्नीपूरमध्ये ५ एकर जागा देण्यात आली. येथे सध्या मशीद बांधण्यात येत आहे. यासाठी स्थापन केलेल्या इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनची येथे २०० खाटांचे रुग्णालय, ग्रंथालय आणि संग्रहालय बनवण्याची योजना आहे; मात्र या कार्यासाठी अद्याप केवळ २० लाख रुपयेच देगणी मिळाल्याचे समोर आले आहे.
या फाउंडेशनने देणगीसाठी बँकेत खाते उघडले. फाउंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसेन यांनी सांगितले, ‘आम्हाला मिळणार्या रकमेवर प्राप्तीकर सवलत मिळत नसल्याने अल्प देणगी मिळाली. ८०-जी ची सवलत मिळाल्यानंतर रक्कम वाढेल. आमचा उद्देश रुग्णालय बनवायचा आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी खर्च येईल. आम्ही घरोघरी जाऊन देणगी मागत नाही. प्राप्तीकर सवलतीनंतर विदेशातील आर्थिक साहाय्याच्या सवलतीसाठी अर्ज करणार.