तू भक्तवत्सल मन माझे चंचल । करी कृपा माय-बाप दे भक्ती अचल ॥
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीविषयी साधक आणि हितचिंतक यांनी काव्यरूपात व्यक्त केलेली कृतज्ञता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रीतीविषयी साधक आणि हितचिंतक यांनी काव्यरूपात व्यक्त केलेली कृतज्ञता !
आज प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे स्वतःच्या जीवनातील आनंदापासून वंचित आहे. त्या आनंदाचा स्रोत स्वतःच्या अंतरातच आहे, हे पुनःपुन्हा सांगून षडरिपुंच्या गर्तेतून साधकांना बाहेर काढणे, हे त्यांच्या प्रीतीचे अत्त्युच्च टोक आहे.
‘दहा सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा एका पेहेलवानात अधिक शक्ती असते. त्याप्रमाणे साधना न करता राष्ट्रकार्य करणार्यांपेक्षा राष्ट्रकार्य करणार्या भक्तामध्ये अनेक पटींनी अधिक शक्ती असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
मानवी जीवनात अनेक समस्या येतात. राष्ट्र आणि धर्म यांसमोरही सद्यःस्थितीत अनेक समस्या आहेत. असे असूनही एकेका समस्येवर कोणता उपाय योजावा, यासाठी वेळ न घालवता साधना केल्यानेच व्यक्तीचे मूलभूत भले होणार आहे, हे परात्पर गुरु डॉक्टर वारंवार मनावर बिंबवतात.
‘गुरुविना शिष्य नाही आणि शिष्याविना गुरु नाही’, अशी एक म्हण आहे. ‘शिष्याचे जीवन आनंदी असणे’, यातच गुरूंचा आनंद असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेही तसेच आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार ‘प्रीती’ या गुणाशी संबंधित ग्रहयोग आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मकुंडलीतील ‘प्रीती’ हा गुण दर्शवणारे ग्रहयोग यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.
‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत.
सनातनच्या माध्यमातून साधना करणार्या काही साधकांना वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास, हे सूक्ष्मातून चालणार्या देवासुर युद्धाचे लक्षण असते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगतांना ‘मी कौरवांना सूक्ष्मातून आधीच मारले आहे.
३१.१२.२००९ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या वापरातील पांढर्या रंगाच्या एका बंडीचा रंग हाताच्या बाह्या, पोट आणि छाती या ठिकाणी गुलाबी झाल्याचा दिसला.
‘उच्च कोटीच्या संतांनी हाताळलेल्या दैनंदिन उपयोगाच्या निर्जीव वस्तूही त्या संतांमधील सत्त्वगुणाने भारित होऊन पावन होतात. संतांनी हाताळलेल्या वस्तूंचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल.