परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह आणि त्यांच्या वापरातील वस्तू यांवर गुलाबी छटा येणे

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. प.पू. डॉक्टरांच्या हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होणे, म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्‍वराच्या सर्वव्यापी प्रीतीच्या रंगाचा तो चमत्कार असणे

‘प.पू. डॉक्टरांची त्वचा, नखे, केस जसे पिवळे, सोनेरी होत आहेत, तसेच त्यांच्या डोळ्यांच्या आतील भाग हाता-पायांचे तळवे, जीभ आणि ओठही गुलाबी होत आहेत. प.पू. डॉक्टरांमध्ये असलेल्या ईश्‍वराच्या सर्वव्यापी प्रीतीच्या रंगाचा तो आविष्कार आहे.

२. बोटांच्या पेरांचे अग्रभाग अधिक गुलाबी होणे

प.पू. डॉक्टरांच्या हाताच्या बोटाच्या पेरांचे अग्रभाग अधिक गुलाबी दिसतात; कारण बोटांचे अग्रभाग कार्यात अधिक संवेदनशील असल्याने या भागांतून प्रीतीदर्शक गुलाबी रंग अधिक बाहेर पडतांना दिसतो.

३. प.पू. डॉक्टर बोलत असतांना ओठांचा, तसेच जीभेचा रंग अधिक गुलाबी होतांना जाणवणे

प.पू. डॉक्टर बोलतात, त्या वेळी त्यांच्या ओठांचा, तोंडातील आतील पोकळीचा, तसेच जीभेचा रंग अधिक गुलाबी होतांना दिसतो. त्यांच्या वाणीतून समष्टीच्या कल्याणासाठी बाहेर पडणार्‍या प्रीतीदर्शक लहरींच्या स्पर्शाने त्यांच्या तोंडाच्या पोकळीतील प्रीतीदर्शक गुलाबी रंगाला जागृती येत असल्याचेच हे लक्षण आहे.’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०११)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील प्रीतीचा दृश्य परिणाम !

प.पू. डॉक्टरांमध्ये असलेल्या ईश्‍वराच्या सर्वव्यापी प्रीतीमुळे गुलाबी झालेली त्यांची जीभ (वर्ष २०११)
परात्पर गुरु डॉक्टरांच्या डोळ्यांच्या आतील गुलाबी झालेला भाग (वर्ष २०११)
गुलाबी छटा आलेले बोटाच्या पेरांचे अग्रभाग आणि चैतन्यमय पिवळी नखे