गेल्या २४ घंट्यांत इटलीमध्ये ९१५ जणांचा मृत्यू

  • कोरोनाचा हाहाःकार !

  • अमेरिकेत रुग्णांची संख्या १ लाख ४ सहस्र २०५

  • स्पेनमध्ये १ सहस्र ६६० जणांना लागण

वॅशिंग्टन – जगभरात १९५ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्ण आणि व मृत यांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५ लाख ९७ सहस्र २६७ झाली असून २७ सहस्र ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली असून तेथे आतापर्यंत ९ सहस्र १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये गेल्या २४ घंट्यांत ९१५ जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत ८६ सहस्र ४९८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या महामारीमुळे अमेरिकेतील रुग्णांची संख्या जगभरामध्ये सर्वाधिक म्हणजे १ लाख ४ सहस्र २०५ इतकी झाली आहे. तेथे मृत्यू झालेल्यांची संख्या १ सहस्र ७०१ नोंदवण्यात आली आहे. न्यूयार्कमध्ये ५१२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

१. स्पेनमध्ये १ सहस्र ६६० जणांना कोरोनाची लागण झाली असून तेथील मृतांची संख्या ५ सहस्र १३८ झाली आहे.

२. जर्मनीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेले एकूण ५० सहस्र ८७१ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे.

३. फ्रान्समध्ये आतापर्यंत ३२ सहस्र ९६४ जणांना लागण झाली असून आतापर्यंत १ सहस्र ९९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

४. ब्रिटनमध्ये प्रादुर्भाव झालेले १४ सहस्र ५४३ रुग्ण असून ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे.