काही जण मरणारच आहे ! – ब्राझीलचे राष्ट्रपती

जायर बोल्सोनारो

ब्रासिलिया (ब्राझील) – ‘मला क्षमा करा. काही जण मरणारच आहेत. वाहतुकीमुळे एखाद्याचा मृत्यू होतो; म्हणून तुम्ही एका चारचाकी वाहनाचा कारखाना बंद करू शकत नाही’, असे विधान ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयी त्यांच्या घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले.

बोल्सोनारो पुढे म्हणाले की, ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य स्थान असणार्‍या साओ पावलोमध्ये मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. असे असले, तरी कोरोनाच्या विरोधात आपण आपले काम चालू ठेवणे आवश्यक आहे.