मानवी बुद्धीच्या मर्यादा !
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’
‘आता एकेका अशिलाची बाजू मांडणारे नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडणारे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्ता हवेत !’
आकाशातील ग्रहांविषयी विज्ञान जो शोध घेते, तो केवळ भौतिक दृष्टीने आहे. याउलट हिंदु धर्मातील विज्ञान ग्रहांच्या भौतिक माहितीसोबत ‘ग्रहांचा परिणाम काय होतो ? कधी होतो ? आणि दुष्परिणाम होणार असले, तर त्यावर उपाय काय ?’, असे सर्व सांगते.
‘आता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी सहस्रो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत !’
‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.
‘पाश्चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, ‘माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा.’ याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळते.’
‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्वराची कृपा होते.
‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कलियुगातील या काळात धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नसून, ते केवळ योग्य वेळेची वाट पहात आहेत’, हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावे.
‘सनातन करत असलेले शेकडो यज्ञ आणि ग्रंथप्रकाशने यांचा मूळ उद्देश ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा असला, तरी त्यातून प्रथम एक ‘आदर्श राष्ट्र’ निर्माण होईल आणि त्यानंतर कालांतराने खर्या अर्थाने ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना होईल.’
अध्यात्माच्या संदर्भात जिज्ञासा असणारे अनेक जण त्यासंदर्भातील पुस्तके वाचणे, प्रवचने ऐकणे यांसारख्या माध्यमातून केवळ बौद्धिक स्तरावरील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केवळ त्यांच्या माहितीमध्ये भर पडते; पण त्यातून साधना मात्र होत नाही.