मुंबई – भारतात अन्न आणि औषध प्रशासन (एफ्.डी.आय.) आणि अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.आय.) या सरकारच्या संस्था असतांनाही काही मुसलमान संस्था ‘हलाल’ प्रमाणपत्र देत आहेत. यासाठी या संस्था आस्थापनांकडून पुष्कळ मोठी रक्कम घेतात. ही रक्कम या संस्थांकडेच रहाते. भारत सरकारला यामधून एकही पैसा मिळत नाही. यामुळे या ‘हलाल प्रमाणपत्र’ पद्धतीमुळे निधर्मी व्यवस्था असलेल्या भारतात समांतर इस्लामी अर्थव्यवस्थेचे एक भयंकर षड्यंत्र रचले गेले आहे. भारतात समांतर इस्लामी अर्थव्यवस्था ही देशाच्या सार्वभौमत्वावर आक्रमण आहे. मुसलमान समाजात ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाशी संबधित होती; मात्र आता ही संकल्पना शाकाहारी पदार्थ, तेल, चॉकलेट, चिप्स, हॉटेल एवढेच नव्हे, तर रहिवासी संकुले आणि पर्यटन क्षेत्रातही राबवली जाणे यांमुळे हे षड्यंत्र आहे, हे स्पष्ट होते. म्हणून हिंदु राष्ट्र समन्वय समितीने ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन समाजाला केले आहे. समिती यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने समाजात जागृती करत आहे. समितीच्या या उपक्रमाला समाजातूनही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. याचा हा सचित्र आढावा.
मुलुंड तहसीलदारांना निवेदन !
याविषयीचे निवेदन मुलुंड तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. या वेळी तहसीलदार दिलीप रायण्णावर यांच्या अनुपस्थितीत महसूल साहाय्यक जयेश सावंत यांनी निवेदन स्वीकारले.
व्यापारी, उत्सव मंडळे, रहिवासी मंडळे, सामाजिक संस्था यांना निवेदन !
सार्वजनिक उत्सव मंडळे, रहिवासी मंडळे, तसेच सामाजिक मंडळांना समितीच्या कार्यकर्त्यांनी भेटी देऊन त्यांना विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. या वेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आणि आपण इतरांचेही प्रबोधन करू, असे त्यांनी सांगितले.
जागृतीपर हस्तपत्रकांचे वितरण !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने या विषयासंदर्भात जागृती करणारी हस्तपत्रके छापून ती समाजातील व्यक्ती, मंदिरे, सार्वजनिक उत्सव मंडळे आणि रहिवासी मंडळे यांना वितरण केली.
फलकांद्वारे प्रबोधन !
मंदिरे, सार्वजनिक उत्सव मंडळांचे परिसर, रहिवासी संकुले, तसेच चौकाचौकांत या संदर्भात प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले. अनेक मंदिरे, मंडळे, हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वखर्चाने आणि स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन फलक लावले.
सामाजिक माध्यमातून मोहिमेला उदंड प्रतिसाद !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने या मोहिमेचा सामाजिक माध्यमांवरून प्रसार केला. याला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक माध्यमांमुळे हा विषय समाजात मोठ्या प्रमाणात पोचत आहे आणि अनेक जण या मोहिमेत जोडत आहेत.