जिज्ञासूंनो, अध्यात्माच्या संदर्भात केवळ बौद्धिक माहिती मिळवण्यात वेळ वाया न घालवता, प्रत्यक्ष साधना करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्माच्या संदर्भात जिज्ञासा असणारे अनेक जण त्यासंदर्भातील पुस्तके वाचणे, प्रवचने ऐकणे यांसारख्या माध्यमातून केवळ बौद्धिक स्तरावरील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे केवळ त्यांच्या माहितीमध्ये भर पडते; पण त्यातून साधना मात्र होत नाही. यासाठी जिज्ञासूंनो, आपले अनेक ऋषी-मुनी आणि संत यांनी अध्यात्म अन् साधना या संदर्भात पुष्कळ काही लिहून ठेवले आहे. त्याचा अभ्यास करून अधिकाधिक वेळ त्यानुसार साधना करण्यासाठी द्यावा. केवळ अभ्यास करण्यात वेळ वाया जाऊ देऊ नये !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके