१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार असून योग्य वेळ येताच ते पृथ्वीवर धर्मसंस्थापना करणार असणे
‘प्रत्येक युगात ‘धर्मसंस्थापना’ करणे’ हे श्रीविष्णूचे कार्य आहे. श्रीविष्णूने प्रत्येक युगात धर्मसंस्थापनेसाठी निरनिराळे अवतार घेतले आहेत. कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले होय. ‘योग्य वेळ आणि योग्य प्रसंग येताच श्रीविष्णूचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पृथ्वीवर ‘धर्मसंस्थापना’ करतील’, यात संशय नाही.
२. श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांच्या लीला !
जे शिवधनुष्य उचलणे महाबली योद्ध्यांना शक्य झाले नाही, ते शिवधनुष्य श्रीरामाने खेळण्यासारखे उचलून मोडले. यासाठी श्रीरामाला वीज चमकते, त्यापेक्षाही अल्प कालावधी लागला. त्याचप्रमाणे जे युद्ध १८ वर्षे चालणार होते, ते महाभारतीय युद्ध श्रीकृष्णाने अवघ्या १८ दिवसांत संपवले.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले धर्मसंस्थापनेसाठी योग्य वेळेची वाट पहात असणे
‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे रूप असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कलियुगातील या काळात धर्मसंस्थापना करण्यासाठी वेळ लागत नसून, ते केवळ योग्य वेळेची वाट पहात आहेत’, हे सर्व साधकांनी लक्षात घ्यावे.
श्रीमन्नारायणाचे पृथ्वीवरील मूर्तीमंत रूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या चरणी आम्हा सप्तर्षींचे त्रिवार वंदन !’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून), (२६.५.२०२४, सकाळी ११ वाजता)