साम्यवाद्यांसाठी हास्यास्पद नव्हे काय ?
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’
‘साम्यवाद्यांची सर्वांत हास्यास्पद गोष्ट अशी की, त्यांच्यातही राज्यकर्ते, प्रशासन आणि जनता असा भेद असतो.’
‘साधना करणारे ‘पुढचा जन्म नको. साधना करून याच जन्मात मोक्षाला जाऊया’, अशी इच्छा बाळगतात, तर राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना ‘धर्मकार्य करण्यासाठी पुनः पुन्हा जन्म मिळावा’, असे वाटते. ही स्वेच्छा म्हटली, तरी ‘पुढचा जन्म नको’ हीसुद्धा स्वेच्छाच ठरते !’
‘वैद्यकीय, अर्थ, न्याय इत्यादी सर्वच क्षेत्रांत सर्व जण तज्ञांचे ऐकतात; पण त्याहून सूक्ष्म असणार्या अध्यात्माच्या क्षेत्रात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी हिंदू स्वतःला अधिक शहाणे समजतात !’
‘शालेय शिक्षणात जीवनात सर्वांत उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
पूर्वीच्या काळी हिंदू धर्माचरणी आणि धर्माभिमानी होते. त्यामुळे त्यांना ‘धर्माे रक्षति रक्षितः ।’ (मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५) म्हणजे ‘धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो’, हे लागू होत होते.
‘गीता केवळ शिकू नका, तर तिच्यातील शिकवण कृतीत आणून हिंदु राष्ट्राची स्थापना करा !’
‘साधकांना निवडणुकांच्या निकालांचे कौतुक नसते; कारण त्यांना ‘ईश्वरी राज्याची (हिंदु राष्ट्राची) स्थापना झाल्यावरच सर्व अडचणी सुटणार आहेत आणि आनंदप्राप्ती होणार आहे’, याची निश्चिती असते.
‘निवडणुकांचा निकाल घोषित झाला की, विजयी उमेदवाराला खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे त्याच्यासाठी कार्य करणारे त्याचे कार्यकर्ते आणि त्याला मतदान करणारे मतदार या सर्वांनाही आनंद होतो; पण हा आनंद त्यांना ५ वर्षांतून एकदाच मिळतो.
ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्हेने काळजी घेतली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी ‘वापरा आणि फेका’ या पाश्चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात.
‘सागराकडे पाहून त्याचा बुद्धीने अभ्यास करायचा म्हटले, तर त्याची खोली आणि तेथील विविध गोष्टी कळत नाहीत. त्याचप्रमाणे स्थूल गोष्टींचा बुद्धीने अभ्यास करून अध्यात्मातील सूक्ष्म जग कळत नाही.’