ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम नाही !

ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.

हिंदूंनो, गाेदानापेक्षा ‘गोरक्षण’ महत्त्वाचे आहे !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’

ईश्वरी राज्यात साधना हाच प्रशासनाचा पाया !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’

शाळांना हे लज्जास्पद नव्हे का ?

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’

विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात निष्कर्ष काढण्यातील भेद !

‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात भारतात इंग्रजी भाषा नसेल !

‘हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला ‘नोकरी मिळावी’, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे अद्वितीय महत्त्व !

‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आध्यात्मिक साधना करणारे आणि व्यक्तीस्वातंत्र्यवाले यांच्यातील भेद !

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वेच्छेनुसार वागतात. त्यामुळे ते सुखी होतात, तर साधना करणारे प्रथम परेच्छेने आणि नंतर ईश्‍वरेच्छेने वागतात. त्यामुळे ते आनंदी होतात.’ 

धार्मिक कार्यास सन्मार्गाने मिळवलेले धनच वापरावे !

‘एखाद्या धार्मिक संस्थेला कुणीतरी दिलेले पैसे पापाने मिळवलेले असल्यास ते व्यर्थ जातात, म्हणजे एखाद्या सेवेसाठी ते पैसे वापरले, तर त्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली नसते.

स्वेच्छेला महत्त्व देणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले !

‘रज-तम प्रधान आणि स्वेच्छेला महत्त्व देणार्‍या व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांनी उद्या ‘भ्रष्टाचार, बलात्कार, खून इत्यादी करण्याचे स्वातंत्र्य हवे’, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !’