साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पैसे कमवणे आणि ते वापरणे, हे करतांनाही साधना होणे आवश्यक असते. कर्तव्य म्हणून सत्मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते. मिळवलेले पैसे वापरतांनाही सुखाची आसक्ती न बाळगता मिळालेल्या सुखात समाधानी रहाणे योग्य ठरते. आर्थिक व्यवहार करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक अल्प करणे, हीच खरी साधना होय !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके