परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु धर्मात धर्मप्रसारासह धर्माच्या खोलात, तसेच सूक्ष्मात जाण्याला महत्त्व आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आतापर्यंतच्या ७२ वर्षांपर्यंतच्या शासनकर्त्यांनी मुलांना शाळेत हिंदु धर्म न शिकवल्यामुळे मुलांना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही. त्यामुळे त्यांना धर्माचा अभिमान ज्ञात नाही. याउलट मुसलमानांना धर्माभिमान असल्याने जगभर त्यांचा वचक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारताची ओळख पूर्वी अध्यात्मशास्त्र आणि जगाला साधना शिकवणारा साधूसंतांचा देश’, अशी होती. आता ‘राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान नसलेल्या भ्रष्टाचारी लोकांचा देश’, अशी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गणपति उंदरावर, सरस्वती मोरावर आणि लक्ष्मी कमळावर बसते, म्हणजे त्यांचे सू्क्ष्म शरीर किती हलके असेल, याची कल्पनाही करता येत नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘पिंडीवर दुधाचा अभिषेक करा. जप चालू करा. मग पिंडी चौरंगावर ठेवून पूजा करा. सतत अभिषेक करण्याची आवश्यकता नाही.’
‘आशीर्वाद देण्याचे काम माझे; पण तो घेण्यासाठी सक्षम होण्याचे काम तुमचे !’
‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जीवनात प्रारब्धानुसार ६० टक्के घडते, तर ४० टक्के घडवणे (क्रियमाणकर्म) माणसाच्या हातात असते.’…