परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मतदानात हिंदू जो पैसे देतो, त्याला किंवा दोन उमेदवारांतील कमी वाईट असेल (Lesser of the two evils), त्याला मत देतात; कारण बहुदा चांगले उमेदवार कुठे नसतातच !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एका भक्ताने ३० वर्षांत १३ कोटी रामनामाचा जप केला, तरी त्याला श्रीरामाचे दर्शन झाले नाही. त्याचे कारण वरीलप्रमाणे आहे. यातून हे शिकायला मिळते की, सकाम प्रार्थना स्वेच्छेच्या अंतर्गत येत असल्याने ती केली की, हानी होते, म्हणून ती करू नये.’
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना ‘मानवाने निरनिराळी यंत्रे शोधली’, याचा अहंकार असतो. त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ईश्वराने जीवाणू, पशू, पक्षी, ७० – ८० वर्षे चालणारे एक यंत्र, म्हणजे मानवी शरीर यांच्यासारख्या अब्जावधी गोष्टी बनवल्या आहेत.
‘शेतकर्यांना सुटी नाही. ते आठवड्याचे सातही दिवस शेतात कष्टाचे काम करतात, तरी ते गरीब असतात. याउलट सरकारी कर्मचारी आठवड्यातील पाच दिवसच काम करतात आणि तेही कष्टाचे नसते, तरी त्यांना गरिबी म्हणजे काय, हे ज्ञात नसते.’
‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयक मार्गदर्शन
‘भारतातील शाळांतून तामसिक इंग्रजी भाषा शिकवली जाते; पण सात्त्विक संस्कृत भाषा शिकवत नाहीत. हे साहजिकच आहे; कारण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर राज्य केलेल्या सर्व तामसिक राजकीय पक्षांना तामसिक इंग्रजी भाषा आपली वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजसेवेविषयी मार्गदर्शन !