आजचे वाढदिवस

बदलापूर, ठाणे येथील चि. अन्विथ जयेश शिंदे (वय १ वर्षे) याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (२४.१२.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे.

सनातन धर्ममार्ग जर सुव्यवस्थित राहिला, तरच जग तरेल !

‘‘आमच्या आचारनिष्ठांची, आमच्या श्रुतिस्मृति, देवदेवता, पुराणांची, गो-ब्राह्मणांदींची, तीर्थक्षेत्रांची, विभूतीची, मंदिराची निखंदना (विडंबना) सहन करणार नाही. ज्यांना हे सहन होते, त्यांची निष्ठा आणि भक्ती हे ढोंग आहे. दंभ आहे. ही षंढता आहे. परमात्मा त्याचा धिक्कार करतो. परमात्म्याला वीर भक्ती आवडते.’’

निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. अक्षरा दिनेश बाबते यांच्या आई तसेच श्री. दिनेश बाबते यांच्या सासूबाई श्रीमती आशा मुरलीधरराव भेडसूरकर (वय ७७ वर्षे) यांचे परभणी येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले.

निधन वार्ता

येथील साधिका सौ. चैताली झोडे, अमरावती येथील श्रीमती रोहिणी नांदुरकर, नगर येथील सौ. मानसी मेंढुलकर यांचे वर्धा येथे रहाणारे वडील भालचंद्र गळगटे (वय ७१ वर्षे) यांचे १६ डिसेंबरला हृदयविकाराने निधन झाले.

सरकारचा हस्तक्षेप नसलेले, भक्तांच्या अधीन आणि आदर्श व्यवस्थापन असलेले शेगावचे गजानन महाराज यांचे संस्थान !

जी देवस्थाने सार्वजनिक न्यासाच्या ताब्यात आहेत, जेथे सरकारचा हस्तक्षेप नाही, ती चांगल्या प्रकारे चालवली जातात. शेगावचे गजानन महाराजांचे संस्थान असेच आदर्श आहे.

पाश्‍चात्त्य शिक्षणपद्धतीचे भारतियांवर झालेले दुष्परिणाम ! 

शिक्षणाच्या पाश्‍चिमात्यकरणाचे फलस्वरूप म्हणून भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. व्यक्ती पूर्णतः स्वार्थी आणि एकांगी होत चालली आहे. आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय जीवनशैलीला विसरत चाललो आहोत.

साप्ताहिक सनातन प्रभातच्या वितरणास पुन्हा आरंभ !

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर दळवळणबंदीमुळे साप्ताहिक सनातन प्रभात वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आता पुन्हा साप्ताहिक सनातन प्रभातची छपाई चालू करण्यात आली असून पुन्हा वाचकांपर्यंत साप्ताहिकाचा अंक टपालाच्या माध्यमातून पोचवत आहोत. – संपादक

केवळ शारीरिक कामापुरती सीमित केलेली योगसाधना, हा भारतियांचा करंटेपणा !

पश्‍चिमेतील कुणी विद्वान योगसाधनेची प्रशंसा करतो, तेव्हा आम्हाला त्याचे महत्त्व लक्षात येते आणि आम्ही त्याला योगसाधनेच्या नाही, तर योगाच्या रूपात स्वीकारतो.

भारतात सरकार आहे का ?

‘भारतात ‘अ‍ॅपल’चे आयफोन बनवणारे आस्थापन ‘विस्ट्रॉन कॉर्पोरेशन’च्या कारखान्यावर १२ डिसेंबर या दिवशी आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी वेतन कपातीचा विरोध म्हणून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती.

पाठ्यपुस्तकात असे धडे देणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

‘कर्नाटक राज्यातील ६ वीच्या विज्ञानातील एक धडा हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धड्यातून ब्राह्मणांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत, असे शिक्षणमंत्री एस्. सुरेश कुमार यांनी म्हटले आहे.