बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही ! – ब्राह्मण महासंघाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ‘ब्राह्मणांना आरक्षण हवे’, हे सूत्रच आले नाही. यासंबंधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘कुणालाच आरक्षण नको’, अशी काही जणांची भूमिका होती…

अडीच वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, भाजप

अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर  महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे…

सातारा येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा निग्रह !

छत्रपती शिवराय आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये २४ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ चैतन्यमय वातावरणात पार पडली.

१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !

महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे

पुरातत्व विभागाच्या कामामध्ये सुबकता हवी ! – उपमुख्यमंत्री

सिंदखेडराजा येथील राजवाडा दुरुस्तीचे काम पाहून अजित पवार अप्रसन्न !

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे परिवहन आयुक्तांना निवेदन !

हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १८ मे या दिवशी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली.

राज्यातील ६७४ अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश !

राज्यातील ६७४ शाळा अनधिकृत असल्याने त्या चालू राहिल्याने तेथील कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

‘विश्वसुंदरी’ नको, तर ‘वृक्षसुंदरी किताब’ चालू करण्याची आवश्यकता ! – सयाजी शिंदे, अभिनेता

बार्शी (सोलापूर) येथे ‘मातृभूमी प्रतिष्ठान’च्या वतीने ‘भगवंत व्याख्यानमाले’चा शुभारंभ !

धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॉन्व्हेंट शाळां’वर कारवाई करा ! – किशोर घाटगे, शिवसेना

देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. त्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत.

बेळगाव येथे ‘हिंदू एकता दिंडी’त धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे २३ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली.