‘माझी वसुंधरा’ मोहिमेत सोलापूर शहराचा राज्यात चौथा क्रमांक !

‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत ‘अमृत शहरे’मध्ये सोलापूर महापालिकेस राज्यात चौथा, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.

उजनी (जिल्हा सोलापूर) धरणातील प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन

(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला !’ – जितेंद्र आव्हाड यांचे विखारी वक्तव्य

सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणाचा संदर्भ देत वाद उकरून काढण्याची आव्हाड यांची खोड जुनीच आहे ! कायम प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रसिद्धीचा स्टंटच आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

राज्यातील शाळा १५ जूनला चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, १३ जून या दिवशी केवळ पहिलीच्या शाळांसाठी ‘पहिले पाऊल’ हा कार्यक्रम होणार आहे. राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अधिवक्ता दत्ता सणस, हिंदु महासभा

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’द्वारे मागणी !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान !

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून या दिवशी सकाळी ७ वाजता शेगावहून प्रस्थान झाले. गजानन महाराजांच्या पालखी वारीचे हे ५३ वे वर्ष आहे.

‘माझी वसुंधरा’ अभियानात अमृत गटामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय !

याचे पारितोषिक वितरण ५ जून या दिवशी टाटा थिएटर, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचा ठाणे येथे मोर्चा !

आरोग्य सेवा देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आधुनिक वैद्यांच्या जागी मांत्रिकांची नियुक्ती करावी, अशी उपरोधिक मागणी करत श्रमजीवी संघटनेने येथील साकेत मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढला.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा  !

कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ अवैध !

गोव्यातील अनेक ‘मसाज पार्लर’ (मर्दन करण्याचे ठिकाण) अवैध असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार गोव्यात कार्यरत असलेले ‘मसाज पार्लर’ची सरकार दरबारी नोंदणी करतांना वेगळ्या नावाने करण्यात आली आहे.