ज्योतिषशास्त्र हे जीवनासाठी दिशादर्शक ! – भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

ज्योतिष हे अनुभवशास्त्र आहे. माझ्या आई-वडिलांचा ज्योतिषशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. ज्योतिषशास्त्रामुळे अनेकांचे शंकानिरसन तर होतेच, तसेच शिवाय समाजाला योग्य मार्गदर्शन मिळू शकते.

कोरोनाविषयक वार्ता

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते सध्या घरीच विलगीकरणात असून त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना दुसर्‍यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

अमरावती येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त व्याख्यानमाला !

येथील दर्यापूर तालुक्यात महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांना प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आले.

धर्मावरील आघात परतवून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी त्याग करायला सिद्ध होऊया ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण यांसारख्या आघातांचे वादळ परतवून लावण्यासाठी त्यावरील अंतिम उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! त्यासाठी त्याग करण्यास सिद्ध होऊया !

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडातील दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल ! – आमदार मनीषा कायंदे, शिवसेना

म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्याकांडाविषयी सर्व माहिती घेतली असून दोषींना शिक्षा होण्यासाठी शासन ठोस पावले उचलेल – शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे

पालखी मार्ग आणि पालखी तळावरील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावावीत !

आढावा बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची सूचना

बळजोरीने बायबल शिकवणाऱ्या संस्थांनी हिंदूंना सहिष्णू समजू नये ! – ह.भ.प. मदन महाराज तिरमारे

आमची भारतीय संस्कृती महान आहे. मातेसमोर नतमस्तक होण्याची शिकवण आम्हाला आमची संस्कृती शिकवते. मातेवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रसंगी हनुमंतासारखी क्षात्रवृत्ती दाखवण्याची शिकवणही ती देते.

सद्गुरु चिले महाराज यांचे शिष्य पू. गुप्तेबाबा यांचा देहत्याग

पू. गुप्तेबाबा यांनी सद्गुरु चिले महाराज यांची अत्यंत भावपूर्ण सेवा केली. सद्गुरु चिले महाराजांनी त्यांना ‘तुझे ते माझं आणि माझं ते तुझं’, असा आशीर्वाद दिला होता.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात चोरून अमली पदार्थ नेणार्‍या कारागृह सुरक्षारक्षकाला अटक

कारागृहातील बंद्यांमध्ये मारहाण होणे, त्यांना भ्रमणभाष पुरवणे, अमली पदार्थ पुरवणे असे अनेक अपप्रकार उघड होतात. यावरून कारागृह पोलिसांचा कारभार ढिसाळपणे चालू आहे, हे लक्षात येते. सरकारने यासंबंधी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

श्रीक्षेत्र सोळशी (सातारा) येथे ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

कोरेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोळशी येथे शनीजयंतीनिमित्त शनैश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी ‘शनैश्वर कृतज्ञता’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा केला जातो. या वेळी २८ ते ३० मे या कालावधीत या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.