‘ईडी’ चे अधिकारी नवलकिशोर मीणा यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक !

भ्रष्टाचार निपटण्याचे दायित्व असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारीच भ्रष्ट असले, तर भ्रष्टाचार न्यून कधी होणार ? ‘अशा भ्रष्ट अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे’, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !

अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !

श्रीमंत पटवर्धन घराणे हे हिंदवी स्‍वराज्‍याचे ‘दक्षिण दिक्‍पाल’ ! – किशोर पटवर्धन, उद्योजक

या कार्यक्रमात श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्‍या जीवनपटावर आधारित व्‍हिडिओ (ध्‍वनीचित्रचकती) दाखवण्‍यात आला. उद्योजक, अभियंता, संगीत दिग्‍दर्शक, तसेच गणपति पंचायतन मंदिराचे सुशोभिकरण आणि विस्‍तार अशा विविध माध्‍यमांतून राजे सरकार यांनी अखंड जनसेवा केली.

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क करत त्‍यांच्‍या भेटी घेतल्‍या.

‘स्‍टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया’कडून पुणे विद्यापिठात विद्यार्थ्‍यांना मारहाण !

या वेळी काही विद्यार्थ्‍यांनी सदस्‍यता करण्‍यास नकार दिल्‍यानंतर एस्.एफ्.आय. आणि लोकायतच्‍या गुंडांनी विद्यार्थ्‍यांना मारहाण केल्‍याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

दत्तमूर्ती आणि दत्तपादुका यांच्‍यावर आक्रमण करणार्‍यांना शिक्षा कधी होणार ?

चक्रीवादळ आपत्ती निवारण पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘मॉकड्रिल’

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणार्‍या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘दूरदृश्यप्रणाली’द्वारे बैठक घेण्यात आली.

उत्तरप्रदेशात कन्हैयालाल याच्यासारखे हत्याकांड झाले असते, तर परिणाम काय झाले असते, हे तुम्हाला ठाऊक आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ म्हणाले , राजस्थानमधील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी आणि गुंड यांना प्रोत्साहन देणारे सरकार आहे. उत्तरप्रदेशमध्ये कोणताही गुंड गुन्हे करण्याचे धाडस करत नाही.

आरक्षणाच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी वेळ हवा !

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील ठराव !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन