मणीपूरमध्ये जमावाचा सैन्य तळावर आक्रमण करून शस्त्रसाठा लुटण्याचा प्रयत्न !

सैनिकांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले

इंफाळ (मणीपूर) –  येथील मणीपूर रायफल्सच्या तळावर १ नोव्हेंबरच्या रात्री जमावाने आक्रमण करून शस्त्रसाठा लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी सैनिकांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले. या गदारोळामध्ये काही जण घायाळ झाले. या घटनेनंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासह आदिवासी विद्यार्थी संघटनेने तेंगनौपाल जिल्ह्यातील मोरेह शहरात अतिरिक्त पोलीस कमांडो तैनात केल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ४८ घंट्यांच्या बंदची घोषणा केली आहे.