पाककडून हाफीज सईदविरुद्धचे आतंकवादाचे आरोप मागे

मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार हाफीज सईद आणि त्याची संघटना ‘जमात-उद-दवा’च्या विरोधातील आतंकवादाचे आरोप पाकने मागे घेतले. यामुळे मुंबई आक्रमणाच्या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे.

चित्तगाँग (बांगलादेश) येथे धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या चितगाँग जिल्ह्यातील चंदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मुसलमान तरुणांनी एका १७ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिला अज्ञातस्थळी नेले. मुलीला मुसलमान तरुणांनी पळवून नेल्याचे कळताच मुलीच्या पालकांनी चंदगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.

पाकने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर लाभ घेतला ! – डोनाल्ड ट्रम्प

पाकने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर लाभ घेतला, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकशी आता खर्‍या संबंधांना आरंभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

काळ्या धनाच्या प्रकरणी सरकार अतीगोपनीय अहवाल सार्वजनिक करण्याची शक्यता

भारतीय नागरिकांनी विदेशात ठेवलेल्या काळ्या धनाच्या संदर्भातील अतीगोपनीय अहवाल सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. संसदीय अर्थ समितीने या अहवालाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमालियामधील शक्तीशाली बॉम्बस्फोटात २७६ हून अधिक जणांचा मृत्यू, तर ३०० घायाळ

पूर्व अफ्रिकेतील सोमालिया देशाच्या मोगादिशू या राजधानीच्या शहरामध्ये झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत २७६ जणांचा मृत्यू झाला, तर ३०० हून अधिक जण घायाळ झाले आहे.

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबांवर होणार्‍या अत्याचाराला सतत वाचा फोडणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांनी धमकी दिली.

युद्धखोर अमेरिकेशी चर्चेतून नव्हे, तर युद्धातूनच तोडगा शक्य ! – उत्तर कोरिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची ठिणगी उडवली आहे. त्यांनी त्यांच्यातील चिथावणीखोर वृत्ती प्रकट केली आहे. यावर आता चर्चेतून नव्हे, तर केवळ युद्धातूनच तोडगा निघू शकतो.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील रुहिया आखणगड क्षेत्रात एका हिंदु अल्पवयीन शाळकरी मुलीवर ५ धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF